Marathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

esakal

Marathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’

नाशिक : गिरणी कामगाराची कुतरओढ मांडणारी नाट्यकृती ‘मुसक्या’. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६८ व्या नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, जोशी कॉलनी जळगावतर्फे हे नाटक सादर झाले. हेमंत कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा: Korean Drama : जगभर प्रसिद्ध असलेले कोरियन ड्रामा हिंदीमध्येही; हे आहेत टॉप १० ड्रामा

परिस्थिती माणसाला वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने हतबल करत असते. त्याच्यावर येणारी संकटांची मालिका काही संपत नाही आणि एकवेळ अशी येते, की तो या परिस्थितीपुढे खचून आयुष्य संपविण्याचा विचार करतो. मात्र, परिस्थितीने बांधलेल्या त्याच्या मुसक्या इतक्या घट्ट असतात की विचार करूनही तो असे काही करू शकत नाही. त्यामुळे परिस्थिती नेईल तसे त्याला मार्गक्रमण करावे लागते. संकटांवर चालण्याचे भावविश्व दाखविणारी या तिघांची रात्रीची भेट या नाटकातून अनुभवण्यास मिळते.

या नाटकातील पात्र तात्या, रंगराव, नामदेव यांचीही कहाणी अशीच. तिघेही त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून आयुष्याची गाडी पुढे रेटत असतात. परिस्थितीने नाडलेले, पिचलेले हे मित्र जिन्याखाली असलेल्या एका घरात भेटतात. गप्पा मारणे, रात्री उशिरा मिळेल ते खाणे हाच त्यांचा उद्योग.

हेही वाचा: State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’

योगेश शुक्ल, अमोल ठाकूर, अम्मार मोकाशी, मंजूषा भिडे या कलावंतांनी या नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य सचिन आढारे तर प्रकाशयोजना जयेश कुलकर्णी यांनी साकारली. धनंजय धनगर यांनी ध्वनीसंकलन केले तर उदय पाठक यांनी नाटकाला पार्श्वसंगीत दिले. श्रेयस शुक्ल यांनी रंगभूषा तर श्रद्धा शुक्ल यांनी पात्रांच्या वेशभूषा साकारल्या.

अपूर्वा कुलकर्णी, नीलेश जगताप, आशिष राजपूत, लेखराज जोशी यांनी रंगमंच साहाय्य केले. यासाठी जयश्री जोशी, गणेश बारी, पद्मनाभ देशपांडे आणि सचिन चौघुले यांचे सहकार्य लाभले. कलादर्श स्मृतीचिन्ह, जळगाव यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.

हेही वाचा: Theatre Drama:...इथला हर्ष नि शोक हवा!

टॅग्स :Nashikdramamarathi drama