Marathi Rajbhasha Din : भाषिक खेळांतून लावली मायमराठीची गोडी! निफाडच्या वैनतेय विद्यामंदिरातील अनोखा प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students and teachers of Vaintey Primary Vidyamandir Niphad School greeting Kusumagraja while giving information about language games on the occasion of Marathi Raj Bhasha Day.

Marathi Rajbhasha Din : भाषिक खेळांतून लावली मायमराठीची गोडी! निफाडच्या वैनतेय विद्यामंदिरातील अनोखा प्रयोग

निफाड (जि. नाशिक) : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 'मराठी राजभाषा गौरव दिन' म्हणून साजरा करताना वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक गोरख सानप यांनी तयार केलेल्या विविध भाषिक खेळ विशेष आकर्षण ठरले.

या खेळातून मराठी राजभाषा दिन अनोख्या व आनंददायी पद्धतीने साजरा करण्यात आला. (Marathi Rajbhasha Din taste of marathi through language games unique experiment at Vainteya Vidyamandir Niphad nashik news)

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गोरख सानप यांनी तयार केलेले मुळाक्षरांचे आकर्षक मुकुट विद्यार्थ्यांनी परिधान केले. मराठी भाषा अधिक समृद्ध व विद्यार्थ्यांना सहज आत्मसात करता यावी यासाठी विविध भाषिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

यामधे शब्दचक्र, शब्दडोंगर, शब्दभेंड्या, शब्दसाखळी, जोडीदार शोधा, सांगा सांगा नावे सांगा, लपलेले शब्द शोधा, ओळखा मी कोण?, म्हणी पूर्ण करा यासारख्या विविध भाषिक खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

किरण खैरनार यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन केले. संजय जाधव यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त ॲड. ल. जि. उगावकर, राजेश राठी, किरण कापसे, राजेश सोनी, ॲड. दिलीप वाघावकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र राठी, प्रभाकर कुयटे, निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, केंद्रप्रमुख नीलेश शिंदे व पालकांनी कौतुक केले.