Prashant Damle
sakal
नाशिक: रंगमंचावर कला सादर करणारे कलाकारच कलावंत असतात असे नाही, तर आपण सर्वच जण जीवनात नाटकच करीत असतो. मग कुणाशी कसे बोलावे ते व्यक्तिपरत्वे बदलत जाते, फरक एवढाच, की आम्ही सराव करून बोलतो, तर माणूस परिस्थितीनुसार बोलतो. त्यामुळे सर्व जन्मजात कलाकार असल्याची मिश्किल टिप्पणी ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली.