esakal | नाशिक : मराठवाडा मित्र मंडळातर्फे बँक उभारणीची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Mitra Mandal announces start bank in nashik

नाशिक : मराठवाडा मित्र मंडळातर्फे बँक उभारणीची घोषणा

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नाशिक : नाशिक स्थित मराठवाडा मित्र मंडळाची विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत एक मुखाने बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर स्वतंत्र कॉलनी उभारण्याची घोषणा देखील या बैठकीत करण्यात आली आहे.

नवतरूण पिढीसाठी मंडळ मोठे काम उभारणार

मराठवाड्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत केंद्र स्थापन करण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून मराठवाडा मित्र मंडळातील सदस्य विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर या बैठकीच्या निमित्ताने एकत्रित आले होते. शिक्षण, आरोग्य, प्रशासन, उद्योग, राजकारण, समाजकारण, पत्रकरिता, साहित्यिक आदी क्षेत्रात मराठवाड्यातील सदस्य नाशिक मध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. विचारांचे आदान-प्रदान आणि नवतरूण पिढीसाठी मराठवाडा मित्र मंडळ बँकिंग, रोजगार, नौकरी, व्यवसायाच्या संधी आधी विषयांवर लवकरच काम उभे केले जाणार आहे.

हेही वाचा: MPSC : जिल्ह्यातून 14 हजार 932 विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी

कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावत मराठवाडा मित्र मंडळातील डॉक्टर फोरमच्या सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. प्रदीप जायभावे, डॉ. पुरुषोत्तम पुरी, डॉ. संदीप महाजन आदींचा सन्मान ज्येष्ठ सदस्य सुभद्राबाई पुरी, दिगंबर जाधव, परमेश्वर कुदळे, गणपतराव लोमटे, शहाजी मोटे यांच्या हस्ते करण्यात आला. या बैठकीवेळी प्रा. ज्ञानोबा ढगे, अरविंद कुलकर्णी, डी.बी. गोरे, राम शिंदे, प्रा. बुलंगे आदींनी मार्गदर्शन केले.

एक हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प मराठवाडा मित्र मंडळाने केला आहे. मित्र मंडळाचे स्वतंत्र कार्यालय उभारणीसाठी डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी मित्र मंडळला जागा दिली आहे.

या बैठकीचे नियोजन उद्योजक महेश भोरे, सायबरतज्ञ संतोष मुंडे, पत्रकार गणेश जगदाळे यांनी केले होते.

हेही वाचा: ठाकरे सरकारने रोखले शिक्षकांचे पुरस्कार - गिरीश पालवेंचा आरोप

loading image
go to top