esakal | MPSC Exam : जिल्ह्यातून 14 हजार 932 विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा; 'इतके' गैरहजर!
sakal

बोलून बातमी शोधा

mpsc exam

MPSC : जिल्ह्यातून 14 हजार 932 विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : आज (ता.४) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

या परीक्षेत 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. जिल्ह्यातील 58 परीक्षा उपकेंद्रावर झालेल्या या परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी दिली आहे.

हेही वाचा: चाळिशीनंतर लायसन्स काढायचंय? 'हे' असेल आवश्यक!

हेही वाचा: नाशिक : आसारामबापू आश्रमाच्या संचालकाला अटक

loading image
go to top