Market Committee Election: बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; 20 ला सुधारित यादी प्रसिद्ध होणार

election
electionesakal
Updated on

नाशिक : तीन वर्षांपासून लांबणीवर पडत असलेल्या राज्यासह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी (ता. ८) घोषित केला.

त्यानुसार १० फेब्रुवारीपासून मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू होणार असून, २० मार्चला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे. त्यानंतर लागलीच निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटामुळे तीन वर्षांपासून बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गतवर्षी बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित होऊन २९ जानेवारी २०२३ ला मतदान होणार होते.

मात्र, नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार यादीत समावेश न केल्याने सातारा, कोल्हापूरसह नाशिक जिल्ह्यातील सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे निवडणुका पुढे ढकलण्यात येऊ नये, यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. यावर झालेल्या सुनावणीत ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले. राज्य शासनातर्फे तसे प्रतिज्ञापत्रक दाखल करण्यात आले.

त्यामुळे ३० एप्रिलपूर्वी निवडणुका होणार, हे निश्चित झाले होते. मात्र निवडणुका कधी लागणार, याची इच्छुकांना प्रतीक्षा होती. ती संपली असून, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषीत केला आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

election
ZP VS NMC : जिल्हा परिषदेची महापालिकेवर कुरघोडी; परवानगी न घेताच शाळांची तपासणी

या बाजार समित्यांची होणार निवडणूक

जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या बाजार समित्यांची मुदत संपली असून, या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारयादी कार्यक्रम असणार आहे.

असा आहे मतदारयाद्यांचा कार्यक्रम

१) निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ठ करणे ः १० ते २४ फेब्रुवारी

२) सुधारित प्रारूप मतदारयादी घोषीत करणे ः २७ फेब्रुवारी

३) प्रारूप मतदार यादीवर हरकती, आक्षेप मागविणे ः२७ फेब्रुवारी ते ८ मार्च

४) प्राप्त हरकती, आक्षेप यावर निर्णय घेणे ः ८ ते १७ मार्च

५) अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे ः २० मार्च

election
Nashik News : भरणा केल्यानंतर ‘संदर्भ’ ची कारवाई टळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.