सिन्नर- मराठी नववर्ष अर्थात, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यासह शहरातील बाजारपेठा सजल्या असून, घरोघरी गुढ्यांसाठी लागणारे पंचांग, साखेरच्या गाठी, रेशीम वस्त्र, तांबे, पितळ, काशाचा गडू, रांगोळी, पताका, गुढीसाठी बांबू अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. नवीन वस्तू खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.