नाशिक- विवाह जुळवून देणाऱ्या ॲपद्वारे ओळखीतून पंचवटीतील युवतीचे वसईतील युवकाशी विवाह झाला. परंतु विवाहानंतर छळ, मारहाण करीत मांत्रिकाकडून जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार केल्याप्रकरणी उच्चशिक्षित संशयित सासरच्यांविरोधात पंचवटी पोलिसांत जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला असून, पीडितेचा पती उच्चशिक्षित, तर सासू सेवानिवृत्त शिक्षिका आहे.