esakal | लखमापूर : लग्नात सोन्याची चैन-अंगठी न दिल्याने विवाहितेचा छळ; अखेर 'तिचा' सुटला धीर
sakal

बोलून बातमी शोधा

woman

लखमापूर : विवाहितेची आत्महत्या; हुंड्याच्या रक्कमेसाठी छळ

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : हुंडा विरोधी कायदा संसदेत मंजूर झाला. त्याचा उद्देश विवाहित महिलांचे जीवन सुरक्षित व सुखी करण्याचा होता. मात्र, कडक कायदा असूनही निष्प्रभ ठरतो आहे. याचे कारण उदाहरण नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथे पाहायला मिळाले. अतिशय मनाला चटका लावणारी ही घटना आहे.

कडक कायदा असूनही ठरतोय निष्प्रभ

लखमापूर शिवार येथील अर्चना प्रदीप मेसट (२५) ही विवाहीता सोमवारी सोमवारी (ता.१३) लखमापूर शिवारातील राहात्या घरातून शेतात गेली होती, मात्र ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली असता शेतातीलच विहिरीच्या कडेला अर्चना मेसट यांचा मोबाईल आढळला. विहिरीत पडल्याच्या संशयावरून रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी शोधशोध केली असता रात्री उशिरा विहिरीत अर्चनाचा मृतदेह सापडला. दरम्यान मृत अर्चना मेसट यांचे वडील सोपान बारकु देवरे (रा. पांझरवाडी, ता. येवला) यांनी आज (ता.१४) वणी पोलिसांत फिर्याद देत तिच्या मृत्यूस सासरचे जबाबदार असल्याचा आरोप केला. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की मुलीचा विवाह झाल्यापासून पती प्रदीप सुकदेव मेसट, सासरा सुकदेव बाबुराव मेसट व सासू पदमाबाई सुकदेव मेसट हे वारंवार हुंडयाची रक्कम आणि लग्नात सोन्याची चैन व अंगठी दिली नाही यावरून तिचा शारीरीक, मानसिक छळ करीत होते. मारहाण शिविगाळ करीत होते. पतीच्या बाहेर असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मुलीला विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.

हेही वाचा: Nashik Rain : सलग दुसऱ्या दिवशी पश्‍चिम पट्ट्यात अतिवृष्टी

पतीसह सासऱ्यांविरोधात गुन्हा

हुंड्यात पैसे, दागिने दिले नाहीत या कारणाहून लखमापूर (ता. दिंडोरी) येथील विवाहितेस शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.वणी पोलिसांत विवाहितेचा पतीसह सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान घटनेनंतर मुलीचे नातेवाईक संतप्त झाल्याने लखमापूर येथे काहीसा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान काल (ता.१३) पाचच्या सुमारास लखमापूर येथे तणावपूर्ण वातावरणात व पोलिस बंदोबस्तात अर्चनावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

loading image
go to top