esakal | नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर! पोलिस आयुक्तांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

narayan rane

नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान (bjp janashirwad yatra) २४ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी अपशब्द वापरले होते. नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शहर सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर नाशिकमध्ये राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व्हीसीच्या माध्यमातून नाशिक पोलिसांसमोर (nashik police) हजर राहणार आहेत. कधी हजर राहणार या प्रकरणी तसे पत्रही मंत्री राणे यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले भोवले

नाशिकमध्ये राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर नाशिक पोलिसांचे पथक राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, राणे यांना रायगड पोलिसांनी अटक करत रात्री महाड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, नाशिक पोलिसांना श्री. राणे यांच्या वकिलांनी गणेशोत्सव, आरोग्याचे कारण दिले. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांना अटक न करता २ सप्टेंबरला नाशिकला हजर राहण्याचे सांगितले होते. उच्च न्यायालयात राणे यांनी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

हेही वाचा: नाशिक मनपा निवडणूक : ‘राष्ट्रवादी’कडून ५२८ इच्छुकांची चाचपणी

व्हीसीच्या माध्यमातून हजर

नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात राणे यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना पत्र देत २५ सप्टेंबरला व्हीसीच्या माध्यमातून हजर राहणार असल्याचे कळविले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणे यांच्या वकिलांशी बोलून २५ सप्टेंबरला ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) २५ सप्टेंबरला व्हीसीच्या माध्यमातून नाशिक पोलिसांसमोर (nashik police) हजर राहणार आहेत.

हेही वाचा: Nashik Rain : सलग दुसऱ्या दिवशी पश्‍चिम पट्ट्यात अतिवृष्टी

हेही वाचा: नाशिक : पावसाने उघडीप दिल्याने गोदावरीची पाणीपातळी स्थिर

loading image
go to top