सासरचा छळ, प्रकृतीकडे दुर्लक्ष; विवाहितेचा मृत्यू

domestic violence with married woman
domestic violence with married womanesakal

वणी (जि.नाशिक) : ‘तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या लायकीची नाहीस, तू आम्हाला आवडत नाही, तुझ्या घरच्यांनी हुंडा, मानपान दिला नाही. तू माहेरून फर्निचरसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, पैसे आणले नाहीत तर तुला नांदवणार नाही,’ असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ विवाहितेला असह्य झाला. आणि तिची प्रकृती खालावत गेली...(married-woman-death-due-domestic-violence-vani-nashik-marathi-news)

सासरचा शारीरिक व मानसिक छळ विवाहितेला असह्य झाला

होनाजी रामदास ढिकले (वय ४४, रा. पालखेड मिरचीचे, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मुलगी शुभांगीचा ७ जून २०२० ला जयेश संजय बस्ते (रा. हस्तेदुमाला, ता. दिंडोरी) यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिन्यातच पती जयेश, सासरे संजय जगन्नाथ बस्ते, सासू सरला बस्ते, नणंद कस्तुरी अतुल पाटील (रा. जऊळके वणी) यांनी मुलगी शुभांगीला त्रास देण्यास सुरवात केली. ‘तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या लायकीची नाहीस, तू आम्हाला आवडत नाही, तुझ्या घरच्यांनी हुंडा, मानपान दिला नाही. तू माहेरून फर्निचरसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, पैसे आणले नाहीत तर तुला नांदवणार नाही,’ असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे शुभांगीची प्रकृती बिघडली. सासरच्यांनी तिच्यावर औषधोपचार न करताच माहेरी पाठवून दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चौघांवर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी वणी पोलिसांनी पती, सासू, सासरे व नणंद अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.फर्निचरसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्याबरोबरच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील सासरच्या चौघांवर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

domestic violence with married woman
साहित्य संमेलनाची कागदपत्रे द्या; निमंत्रकांना अल्टिमेटम
domestic violence with married woman
इगतपुरीतील रिसॉर्ट..पावसाळा अन् पार्ट्यावरील छापे चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com