
वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेनंतर नाशिकमध्येही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या भक्ती अथर्व गुजराथी (वय ३७) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.