मेशी: येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज व तीन तोळे सोने लंपास केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सौंदाणे-देवळा रस्त्यावर मेशी शिवारात नामदेव वेडू शिरसाठ शेतात राहतात. रविवारी (ता. १०) सकाळी दहाला शिरसाठ वाखारवाडी येथे बहिणीकडे कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले असता तेथून तीनला घरी आले तर कुलूप तोडून दरवाजाची कडी लावलेली दिसली.