Water Crisis
sakal
नाशिक: जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या पुन्हा एकदा डोके वर काढू लागली आहे. शहर हद्दीपासून काही अंतरावर असलेल्या मातोरी येथे उन्हाळा सुरू होण्याअगोदरच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ग्रामस्थांना उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईमुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. गावातील संतप्त महिलांनी शुक्रवारी (ता. ६) ग्रामपंचायत कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढला.