
Sakal Impact : मातोश्री वसतीगृह महिनाभरात सुरू होणार
नाशिक : ‘सारथी- महाज्योतीच्या हटवादीपणामुळे मुली वसतिगृहापासून वंचित, पायलट प्रोजेक्ट उरला नाशिकपुरता’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे नियोजन सचिव श्री. देवरा यांनी सारथी व महाज्योतीच्या व्यवस्थापकांची मंत्रालयात तातडीची बैठक घेवुन नाशिकच्या मातोश्री वसतीगृह एका महिन्याच्या आत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. रस्तोगी उपस्थित होते. या बैठकीत सर्व आक्षेपाचे निराकरण करण्यात आले. नाशिकचे वसतीगृह एका महिन्यात सुरू करावे. रीतसर जाहिरात काढून, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्रवेशित विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सारथी व महाज्योतीची बैठक घ्यावी. (Matoshree hostel will start within a month Mahajyoti Orders of Planning Secretary to the Chief of Chariots Nashik News)
सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
हेही वाचा: Nashik News : अखिल भारतीय लोककला साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन! पाहा Photos
वसतिगृहासाठी कंत्राटी भरती करून घेऊन आवश्यक बाबीची पुर्तता करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी व महाज्योती यांना नोटीस पाठवून १६ जानेवारीपर्यंत वसतीगृह सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.
तसेच नाशिकच्या मातोश्री वसतिगृहाच्या धर्तीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नागपूर व औरंगाबाद येथील वसतीगृहामध्ये सुद्धा अशीच योजना राबविण्यासाठी शासनाला तत्काळ प्रस्ताव द्यावे, अशा सूचनाही बैठकीत दिल्याचे समजते.
मंत्रालयातील नियोजन व उच्च शिक्षण प्रधान सचिवांनी तातडीने दखल घेतल्यामुळे नाशिकच्या शासकीय मातोश्री वसतीगृहात २०० मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी आभार मानले आहे. तसेच नागपूर, औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात ही मुलींच्या वसतिगृहाची विशेष योजना शासनाने राबवावी, अशी विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे.
हेही वाचा: Nashik News : राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आशिमा मित्तलांकडून झाडाझडती!