Sharad Pawar
sakal
नाशिक: अभूतपूर्व गोंधळात पार पडलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतरही मविप्र विद्यापीठ स्थापनेचा मुद्दा अधांतरीच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सोमवारी (ता. १५) घडलेल्या घडामोडींतून स्पष्ट झाले आहे. तसेच पवार यांची भेट घेत भूमिका मांडण्याबाबत दोन्ही गटांची तयारी आहे.