Kumbh Mela
sakal
नाशिक: दर १२ वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्या वेळी महापौर असलेल्या व्यक्तीला जगभरात स्वतःसह नाशिकचे ब्रँडिंग करण्याची संधी असते. पुढील वर्षात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासमोर कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्याबरोबरच तत्पूर्वी पायाभूत सुविधांची विकासकामे पूर्णत्वास नेऊन नाशिकचे नाव जगभर पोहोचविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.