esakal | बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळविली एमबीबीएसची डिग्री; तरुणावर आडगावमध्ये गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळविली एमबीबीएसची पदवी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : तडवी अनुसुचित जाती जमातीचे बनावट जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्राद्वारे नाशिकला डाॅ. वसंतराव पवार मेडीकल काॅलेजमधून एमबीबीएस पदवी घेउन मुंबईत प्रॅक्टीस करणाऱ्या डाॅ. इसलाहूझामा सल्लालुद्दीन अन्सारी (वय 28, भायखळा) याच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (MBBS-degree-obtained-on-basis-of-fake-caste-certificate-marathi-news-jpd93)

बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली एमबीबीएस पदवी

पोलिसांकडे आलेल्या निवावी अर्जानुसार चौकशी होउन आग्रीपाडा (मुंबई) पोलिस ठाण्यातील निरीक्षक बाळासाहेब राउत यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित डाॅ. इसलाहूझामा सल्लाउद्दीन अन्सारी (शाही संतोष भुवन मेघराज शेट्टी मार्ग भायखळा ) याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या अखत्यारीतील मविप्र च्या डाॅ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयात अनुसुचित जमातीच्या बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे 2010-11 शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळवित एमबीबीएस पदवी घेतली. त्यानंतर मुंबईत प्रॅक्टीक्स सुरु केली. अशी तक्रार आहे. आग्रीपाडा पोलिसांकडे आलेल्या निनावी तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी केली असता, त्यात हा प्रकार उजेडात आला. संशयित डाॅ. इलाहुझामा याच्या बहिणीविरोधात पुण्यात अशी तक्रार आली होती.

हेही वाचा: कसारा रेल्वे घाटात दरड कोसळली; ढिगारा हटविण्याचे काम सुरू

हेही वाचा: नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी; पेरण्यांना वेग

loading image