Sandeep Karnik
sakal
नाशिक: अवैधरीत्या शस्त्रांचा धाक दाखवून हप्ता वसुली, खंडणी वसुलीसह प्राणघातक हल्ला करीत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या पीएल ग्रुपचा म्होरक्या प्रकाश लोंढे याच्यासह १७ सराईत गुन्हेगारांविरोधात ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तसे आदेशच जारी केले. प्रकाश लोंढे हा रिपाइंचा माजी नगरसेवक व उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आयुक्त कर्णिक यांच्या या कारवाईने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे मात्र दणाणले असून, बागूल टोळीविरोधातही ‘मकोका’ कारवाईची शक्यता आहे.