Crime
sakal
नाशिक: इंदिरानगर हद्दीत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज तस्करी प्रकरणातील डीलर संशयित महिलेसह एकाला सिडकोतून अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली असून, एमडी तस्करीत पुन्हा एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला आहे.