Measles Disease : नाशिक ग्रामीणमध्ये गोवरची 8 संशयित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles disease

Measles Disease : नाशिक ग्रामीणमध्ये गोवरची 8 संशयित

नाशिक : शहरात शिरकाव केल्यानंतर गोवर या साथरोगाने नाशिक जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. ग्रामीण भागात एकूण ८ संशयित आढळून आले आहेत. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली. (Measles Disease 8 suspected of Measles in Nashik Rural Nashik News)

राज्यात गोवरने थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर या आजाराचा संसर्ग होऊन बालके दगावलीही आहेत. कालपर्यंत या आजारापासून लांब असलेल्या नाशिक जिल्ह्यातही गोवर संशयित रुग्ण सापडले आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शोध सुरु केल्यानंतर ग्रामीण भागात आठ आणि शहरी भागात पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात काही बालके तीन वर्षाची आहेत तर बारा वर्ष वयोगटातील एका बालकाचाही संशयितात समावेश आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा गळा आवळून खून

जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, निफाड येथे प्रत्येकी २ तर चांदवड आणि मालेगाव येथे प्रत्येकी एक रुग्णाचे लक्षण गोवरचे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे आता अहवालाची प्रतिक्षा आहे.

"ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरु आहेत. त्यात आठ संशयित आढळून आले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लसीकरणावर भर दिला जात आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे."

- डॉ. हर्षल नेहेते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

हेही वाचा: Winter Season : द्राक्षपंढरीला भरली हुडहुडी; यंदाच्या हंगामातील 8.5 नीचांकी पातळीवर तपमान