esakal | केवळ मोदींची खुर्ची लिलावात काढणे बाकी; मेधा पाटकरांची खोचक प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

medha patkar

केवळ मोदींची खुर्ची लिलावात काढणे बाकी - मेधा पाटकर

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : सत्ताधारी प्रत्येक क्षेत्रात खासगीकरण करीत खासगी कंपनी आणि ठेकेदारांना पोसण्याचे काम करत आहे. त्यांच्याकडून केवळ मोदींची (Narendra Modi) खुर्ची लिलावात काढणे बाकी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर (medha patkar) यांनी दिली. गंजमाळ येथील रोटरी क्लब हॉलमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगार मेळावा झाला. तसेच, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना जीवनगौरव, मोहन शर्मा यांना कामगार नेते पुरस्कार वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

सत्ताधाऱ्यांकडून खासगी कंपनी, ठेकेदारांना पोसण्याचे काम

मेधा पाटकर म्हणाल्या, की खासगीकरणाच्या मार्गाने सत्ताधाऱ्यांचे सुरू असलेले राजकारण मंजूर नाही. त्यास विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. खासगीकरण करत त्या माध्यमातून राबविण्यात आलेले विविध प्रकल्प त्यातून मिळणारा लाभ स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. खासगी ठेकेदार यांच्या जिवावर २०२६ ची निवडणूक लढवून ती जिंकून येण्याचा त्यांचा उद्देश आहे. भागीदारांचे भले करायचे श्रमिकांची मात्र चिंता नाही, असा त्यांचा अजेंडा आहे. खोटी आश्वासने देत बेरोजगारी निर्माण करणे, त्यांचे कार्य आहे. आरोग्य, संरक्षण, वीज, पाणी, रेल्वे अशा विविध विभागांमध्ये खासगीकरणाचे षडयंत्र राबवले जात आहे. त्याचे परिणाम सामान्य नागरिक, श्रमिक वर्ग सोसत आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन टंचाईमुळे दगावलेले खासगीकरणाचे बळी पडण्याचे एक उदाहरण आहे. आता त्यांच्याकडून खासगीकरणाचा विषाणू शेती क्षेत्रातही घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

हेही वाचा: पावसाने स्मार्टसिटी कामाची पोलखोल

शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे बंद पुकारण्यात आला, यासाठी त्यांचेही धन्यवाद देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाचे स्वागत केले. व्ही. डी. धनवटे, कृष्णा भोईर, मिलिंद रानडे, महेश जोतिराव, राजू देसले, एस. आर. खतीब, अरुण म्हस्के, सलाउद्दीन नाकाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: भगवती दर्शनासाठी महिलांची लोटली गर्दी

loading image
go to top