नाशिक- नाशिक जिल्हा शेती, शिक्षण, उद्योग, पर्यटनासह आता वैद्यकीय क्षेत्रातही भक्कम प्रगती करत आहे. जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालये, ट्रॉमा सेंटर्स, नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जात आहेत. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या प्रगतीत शल्यचिकित्सकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.