नाशिक : सुप्रिया सुळे - सीमा हिरे यांच्या भेटीने खळबळ | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 bjp mla seema hire mp supriya sule

नाशिक : सुप्रिया सुळे - सीमा हिरे यांच्या भेटीने खळबळ


सिडको (नाशिक) : सध्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत असतानाच नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार सीमा हिरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिरे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दौऱ्यामध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांची हजेरी दिसून असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच नुकतेच आमदार सीमा हिरे यांनी मुंबईतील मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर हिरे यांच्या समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. याबाबत खासदार सुळे व आमदार सीमा येथे यांचा फोटो व्हायरल करणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुशील नाईक यांच्याशी बोलणे केले असता, त्यांनी बुधवारी (ता.२४) एका कामानिमित्त सदर भेट झाल्याचे सांगून ही भेट कुठल्याही प्रकारे राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा: नाशिक : साहित्य संमेलनासाठी महापालिकेचा २५ लाखांचा निधी

loading image
go to top