नाशिक : साहित्य संमेलनासाठी महापालिकेचा २५ लाखांचा निधी | Marathi Sahitya Sammelan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 marathi sahitya sammelan

नाशिक : साहित्य संमेलनासाठी महापालिकेचा २५ लाखांचा निधी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला पार पडत आहे. संमेलनासाठी महापालिकेतर्फे पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नुकतेच परवानगीचे पत्र महापालिकेला दिले.

अठरा वर्षानंतर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून प्रत्येक नाशिककरांचा असलेल्या या उत्सवात पालक संस्था म्हणून महापालिकेने देखील निधीचा वाटा उचलण्याची तयारी दर्शविली. परंतू नियमांचा अडसर येत असल्याने पंचवीस लाख रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाची जोरदार तयारी सुरु असताना निधी आवशक्य असल्याने महापालिकेकडे पन्नास लाख रुपयांचा निधी मागण्यात आला. परंतू दोन लाखांच्या वर महापालिकेला निधी देत येत नाही. नियमात तशी तरतुद आहे. त्यामुळे शासनाकडे विशेष परवानगीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला. पंचवीस लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास निधी संमेलन समितीकडे सुपूर्द केला जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली होती. त्यानुसार महापालिकेला राज्य शासनाकडून परवानगी चे प्राप्त पत्र प्राप्त झाले असून 25 लाख रुपये निधी संमेलनासाठी वर्ग करण्यास हरकत नसल्याचे पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना | ‘हे’ कवी नव्हे हो, ‘ते’ शाहीर हवे

loading image
go to top