ZP Recruitment : जिल्हा परिषदेत 2 हजार जागांची मेगा भरती! मेच्या पहिल्या आठवड्यात भरतीची जाहिरात

ZP Nashik latest marathi news
ZP Nashik latest marathi newsesakal

ZP Recruitment : ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के पदे भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्यात १ ते ७ मे या काळात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील २, ५३८ जागा रिक्त असून त्याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ३० जागा भरल्या जाणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या जाहिरातीचा मसुदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Mega recruitment of 2 thousand seats in Zilla Parishad Recruitment advertisement in first week of May nashik news)

राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले.

ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवला आहे. या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत.

यामध्ये दोन हजार ५३८ पदे गट ‘क’ मधील आहेत, तर गट ‘क’ मधील १८८ पदे रिक्त आहेत. ग्रामविकास विभागाने केवळ गट ‘क’ मधील रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे.

या रिक्त जागांच्या ८० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वीच आयबीपीएस कंपनीशी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत करार केला आहे. यामुळे आता भरतीप्रक्रिया पार पडेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सर्व काही सुरळीतपणे पार पडले, तर पुढच्या चार महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ZP Nashik latest marathi news
Maharashtra Din : नाशिकच्या चिवड्याचे नेहरूही होते फॅन; वाचा कोंडाजी चिवडा कसा झाला फेमस?

पुन्हा नवे वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली होती. सरकारने ती रखडलेली प्रक्रिया रद्द करीत सर्व विभागांची पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे जाहीर केले होते.

मात्र, विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती पुन्हा रखडली होती. दरम्यान आता पुन्हा नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

संगमनेरे, परदेशी समितीवर

ग्रामविकास विभाग तर्फे राज्यभर होणाऱ्या नोकर भरतीसाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीवर नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे आणि जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची निवड झाली आहे.

ही समिती नोकरी भरती पारदर्शी व निर्विघ्न पार पाडण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. शुक्रवारी (ता.२८) त्याबाबत पुण्यात बैठक होणार आहे.

ZP Nashik latest marathi news
Market Committee Election : सदस्य संख्येइतके मतदानाचा मतदारास अधिकार; सहकार प्राधिकरणाचे पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com