मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे काळाची गरज

मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे काळाची गरज
Published on: 
NSK26H31882 निफाड : पोस्टर प्रदर्शन स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित प्रा. अभय वडघुले, प्रा. आर.डी. शिंदे, प्रा. एस.आर. जाधव, प्रा. महेश बनकर, प्रा. सारिका दौंड. -------------- मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे काळाची गरज प्राचार्य डॉ.‌ काळे : निफाड महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन सकाळ वृत्तसेवा निफाड, ता. १० : बदलत्या जीवनशैलीत विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. बी. काळे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन स्पर्धा झाली, त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर व अभ्यासपूर्ण पोस्टर्स सादर करून मानसिक आरोग्याबद्दल जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. मानसशास्त्राचे प्राध्यापक अभय वडघुले, मराठी विभागप्रमुख प्रा. आर. डी. शिंदे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. आर. जाधव, प्रा. महेश बनकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सची पाहणी करून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सारिका दौंड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. --------- चौकट विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळाला. या वेळी कामाच्या ठिकाणचा ताण, संवाद साधा, मन मोकळे करा, स्वतःची काळजी, सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर्सचे सादरीकरण केले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com