Nashik News: गुंतवणूक अन्‌ सामंजस कराराबाबत माहिती पोचवा BJP राज्यस्तरीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना संदेश

BJP
BJPesakal

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे मताधिक्य टिकवण्यासाठी तळागाळापर्यंत मतदारांपर्यंत जाताना राज्यात ९५ हजार ३६८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला दिलेली मान्यता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात एक कोटी ३७ लाख रुपयांच्या झालेले सामंजस करार याबाबत माहिती पोहोचविण्याचा संदेश बैठकीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.१०) देण्यात आला.

या संदर्भात दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत ठराव पारित केला जाणार आहे. (Message to office bearers at BJP state level meeting to convey information on investment and mutual agreement Nashik News)

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवशीय बैठक नाशिकच्या सातपूर येथील डेमॉक्रसी हॉलमध्ये भरविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, बी. एल. संतोष, सहसंघटनमंत्री ओम प्रकाश धूर्वे,

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री विश्वास पाठक, सरचिटणीस विक्रांत पाटील आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

BJP
Dhule News : चोरीस गेलेले बैल शेतकऱ्यांना परत; शिंदखेडा पोलिसांची कारवाई

बैठकीच्या पहिल्या दिवशी कार्यकारिणीतील २३८ पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी कृषी व राजकीय विषयक ठरावावर चर्चा झाली. गुजरातला गेलेल्या उद्योगांना संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सुरू असलेल्या प्रचारावर चर्चा झाली.

त्या अनुषंगाने या टीकेला उत्तर देण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ७५ हजार रोजगार देण्याबरोबरच दाभोस येथील दौऱ्यात एक कोटी ३७ लाख रुपयांच्या सामंजस कराराला मान्यता दिल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

औद्योगिकतेच्या बाबतीत महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करताना यापुढेही पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राहील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करणे, हनुमान चालीसावरून एका महिला खासदाराला १४ दिवस तुरुंगात ठेवणे यासंदर्भात ऊहापोह करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

BJP
Sula Vineyards : गत तिमाहीत सुलाला 39 कोटींचा निव्वळ नफा!

ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी केल्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा औरंगजेब महत्त्वाचे वाटणे स्वाभाविक असल्याची टीका करण्यात आली. हातातून सत्ता जाईल असे लक्षात आल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केल्याचा आरोपही करण्यात आला.

फडणवीस शिंदे सरकारचे अभिनंदन

सहा महिन्यांपूर्वी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या अभिनंदनचा ठराव शनिवारच्या बैठकीत केला जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेल्या यश व आगामी निवडणुका शिंदे यांच्यासोबत एकत्रित लढवण्याचा ठराव देखील केला जाणार आहे.

BJP
YCMOU Convocation : ‘मुक्‍त’ च्‍या दीक्षांत सोहळ्यात सहभागासाठी नोंदणी आवश्‍यक; जाणुन घ्या तपशील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com