Nashik development
sakal
नाशिक: महापालिका हद्दीलगतच्या ३०-३५ किलोमीटरच्या हद्दीत वाढते नागरीकरण लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) विकास आराखडा तयार करण्यासाठी इरादा जाहीर केला आहे. त्यानुसार सहा महिने ते एक वर्षात आराखडा तयार होऊन एनएमआरडीए हद्दीत पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच महसूलवाढ व सुनियोजित विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रामीण भागात विकासाच्या नावाखाली वाढणाऱ्या बकालपणालादेखील ब्रेक लागणार आहे.