MGNREGA Workers Strike : रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यात कामबंद आंदोलन; कामे झाली ठप्प

MGNREGA contract workers protesting in front of Panchayat Samiti office.
MGNREGA contract workers protesting in front of Panchayat Samiti office.esakal

बाणगाव बुद्रुक, नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील मनरेगा विभागाच्या कंत्राटी‎ कर्मचारी संघटनेने आपल्या विविध‎ मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले‎ आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटना आयटकने पाठिंबा दिला आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजने‎ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी,‎ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक‎ सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक‎ आदींचा या आंदोलनात सहभाग आहे.‎ (MGNREGA Workers Strike contract workers strike in district Works stopped Nashik)

बुधवारपासून‎ बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या‎ आंदोलनकर्त्यांनी दिला होता. ‎रोहयो कंत्राटी कर्मचारी दहा ते बारा वर्षापासून‎ अखंडपणे मनरेगाची कामे करीत आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी‎ या कर्मचाऱ्यांनी १८ जानेवारी रोजी राज्यभर एक‎ दिवसीय संप केला होता.

मागण्या पूर्ण न झाल्याने आता‎ लेखणी बंद व ऑनलाइन अहवालाची सर्व‎ कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला‎ आहे. यासंदर्भात वेळीच ठोस पावले न उचलण्याने बुधवार १ फेब्रुवारीपासून‎ बेमुदत संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपात विविध कर्मचारी संघटनांचा‎ या आंदोलनात सहभागी झाले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

MGNREGA contract workers protesting in front of Panchayat Samiti office.
Nashik Crime News : गोंदे येथील इसमाचा खून करणारा गुन्हेगार ग्रामीण पोलीसांच्या जाळयात

या बेमुदत काम आंदोलनामुळे राज्यभरात रोहयोची कामे ठप्प झाली आहे.‎ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी‎ योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम‎ समान वेतन लागू करण्यात यावे व ‎मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतिबंधात समायोजन‎ करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन‎ देण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना‎ राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी.‎

तसेच ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण‎ करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन‎ करण्यात आले आहे.

या आंदोलनात पंचायत समिती‎ मधील मनरेगा कर्मचारी तुषार बागूल दादा जाधव, सागर घुगे, विवेक देशमुख, विकास राऊत, मंगेश देशमुख, विष्णू महाले आदी सहभागी झाले आहे.

MGNREGA contract workers protesting in front of Panchayat Samiti office.
Kala Katta : मोबाईलच्या मायावी कैदेतून पडा बाहेर; पॉटरी कलेच्या प्रसारासाठी सोनाली पाटील यांचे समर्पण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com