Mhada Scam
sakal
नाशिक: शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याच्या नियमाला फाटा देत ‘म्हाडा’ची फसवणूक केल्याप्रकरणी रविवारी (ता. १५) रात्री शहरातील बांधकाम व्यावसायिकांची धरपकड करण्यात आल्याचे समजते. आठ ते दहा जणांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.