Nashik Mhada Scam : भाजप नेत्यासह १९७ जणांवर अटकेची टांगती तलवार; नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे

Builders Rush for Anticipatory Bail in MHADA Scam : शहर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दिनेश ऊर्फ सोनू मनवानीला अटक केल्याने या गुन्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांसह लागेबांधे असलेल्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले.
Mhada Scam

Mhada Scam

sakal

Updated on

नाशिक: म्हाडा फसवणूक प्रकरणात शहर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दिनेश ऊर्फ सोनू मनवानीला अटक केल्याने या गुन्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांसह लागेबांधे असलेल्या राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे अटक टाळण्यासाठी गुन्हे दाखल असलेल्या १९४ पैकी बहुतांशी संशयितांनी जिल्हा न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. अटकेच्या भीतीने शहरातून पसार झालेल्या सुमारे २५ ते ३० संशयितांनी मंगळवारी (ता. १७) जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्यावर लवकरच सुनावणीची शक्यता आहे, यामुळे पोलिस याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com