
लसीकरणाचा ‘अमळनेर पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात चर्चेत
अमळनेर : पंधरा ते अठरा वर्ष वयोगटासाठी लसीकरण(Vaccination) सुरू झाले असून जिल्ह्याचा विचार करता यात, अमळनेर तालुक्यात विशेष पॅटर्न राबवून शाळांमध्ये लसीकरण(School Vaccination) करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात(rural hospital) तसेच आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाल्याने पहिल्या दिवशी ५० टक्केपेक्षा कमी जणांनी लस घेतली.
हेही वाचा: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गुलाबराव पाटील
शिक्षकांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तांत्रिक अडचणींवर मात करून धाडसी निर्णय घेत शाळांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी दिली. शाळांमध्ये लसीकरण सुरू झाल्यामुळे डी. आर. कन्याशाळा, जी. एस. हायस्कूल, सानेगुरुजी शाळा, प्रताप कॉलेज, पी. बी. ए. इंग्लिश स्कूल, जययोगेश्वर व धनदायी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, टाकरखेडा हायस्कूल, मंगरूळ, शिरूड, लोंढवे, पातोंडा, दहिवद, मांडळ, जानवे, मारवड, जवखेडा, भरवस, पिंगळवाडे आदी १९ शाळांमध्ये लसीकरण झाले. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात डॉ. गिरीश गोसावी, पालिका वैद्यकीय अधिकारी विलास महाजन, यांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. ७) सुमारे ४ हजार युवकांना लस देण्यात आली तर यापूर्वी तीन दिवसात २ हजार ९५० युवकांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यात एकूण १४ हजार ५७० उद्दिष्ट असताना ६ हजार ९५० जणांचे लसीकरण झाले. यावेळी द्रौ. रा. कन्याशाळेत मुख्याध्यापिका जे. के. सोनवणे तसेच इतर पदाधिकारी व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियोजनाने शाळेत लसीकरण यशस्वी झाले.
Web Title: Amalner Pattern Of Vaccination Jalgaon District The Discussion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..