नाशिक- शहराच्या विस्तारीकरणामुळे उपनगरांमध्ये नव्याने वसाहती निर्माण होत असताना, त्या तुलनेत पोलिस गस्त होत नसल्याने गुन्हेगारीला आयते रान मोकळे मिळते आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत असून, चोऱ्या-घरफोड्या आणि चैनस्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसाठी नंदनवन असल्याचेच बोलले जाऊ लागले आहे.