CET Exam
sakal
नाशिक: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नियोजित सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. सीईटी सेलतर्फे शुक्रवारी (ता. २१) यासंदर्भात सूचनापत्र जारी केले. त्यानुसार मार्च ते मेदरम्यान टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा घेतल्या जातील. यंदा प्रथमच एमएचटी-सीईटी आणि एमबीए या शिक्षणक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना सीईटीच्या दोन संधी उपलब्ध असतील.