MHT- CET Exam : अकरावीचे 20, बारावीचे 80 टक्‍के प्रश्‍न

maharashtra CET
maharashtra CETesakal

नाशिक : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि बी. एस्सी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पुढील वर्षी २०२३ मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम जारी केलेला आहे. वीस टक्‍के प्रश्‍न अकरावीच्‍या अभ्यासक्रमावर, तर उर्वरित ऐंशी टक्‍के प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असतील. (MHT CET Exam 20 of 11th 80 of 12th questions Nashik news)

‘सीईटी’ सेलने अभ्यासक्रमाचा तपशील जारी केला आहे. याअंतर्गत प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप व विचारल्‍या जाणाऱ्या प्रश्‍नांबाबतची माहिती नमूद केली आहे. त्‍यानुसार २० टक्‍के प्रश्‍न अकरावीच्‍या अभ्यासक्रमवार आधारित असतील. तर ऐंशी टक्‍के प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमावर आधारित असतील. प्रश्‍नांची काठिण्यपातळी भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित विषयांकरिता जेईई (मेन्‍स) आणि जीवशास्‍त्र विषयाकरिता ‘नीट’ परीक्षेच्‍या स्‍तराइतकी असणार आहे. बारावीशी निगडित प्रश्‍न संपूर्ण अभ्यासक्रमातून विचारले जातील. तर अकरावीसाठी विषयनिहाय धडे निश्‍चित केलेले आहेत.

तीन पेपरचा समावेश

एमएचटी-सीईटी या परीक्षेत प्रत्‍येकी शंभर गुणांसाठीच्या तीन प्रश्‍नपत्रिका असतील. यामध्ये वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जाणार आहेत. चुकीच्‍या उत्तरासाठी गुणकपात (निगेटिव्ह मार्किंग) नसेल. गणित विषयासाठी पन्नास प्रश्‍न (दहा प्रश्‍न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्‍न बारावी अभ्यासक्रमाचे) प्रत्‍येकी दोन गुणांसाठी विचारले जातील.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

maharashtra CET
Nashik News : वैद्यकीय, अग्निशमनाच्या रिक्तपदांसाठी NMCकडून प्रस्ताव

तर पेपर क्रमांक दोनमध्ये भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र या विषयांसाठी प्रत्‍येकी एक गुणासाठी पन्नास प्रश्‍न (दहा प्रश्‍न अकरावी अभ्यासक्रमाचे, ४० प्रश्‍न बारावी अभ्यासक्रमाचे) अशी शंभर गुणांची प्रश्‍नपत्रिका असेल. पेपर क्रमांक तीन हा जीवशास्‍त्राचा असून, प्रत्‍येकी एक गुणासाठी शंभर प्रश्‍न (२० प्रश्‍न अकरावीचे, ८० प्रश्‍न बारावीच्‍या अभ्यासक्रमाचे) विचारले जाणार आहेत. तिन्‍ही पेपरला प्रत्‍येकी नव्वद मिनिटांचा कालावधी असेल.

बारावीचे गुणही महत्त्वाचे

सीईटी परीक्षेसोबत बारावीच्‍या लेखी परीक्षेतील गुणांच्या कामगिरीचाही प्रवेशासाठी आधार घेतला जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे तत्‍कालीनमंत्री उदय सामंत यांनी केली होती. आता सरकार बदलले असून, हीच भूमिका कायम राहून बारावीच्‍या कामगिरीला महत्त्‍व दिले जाते की सध्याच्‍या प्रचलित पद्धतीनुसारच प्रवेश दिले जातात, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

maharashtra CET
Dhule News: आता शेतकऱ्यांमध्ये टोकणयंत्राचा बोलबाला..!; सामान्य शेतकऱ्यांचे यंत्रास प्राधान्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com