Nashik News : एमआयडीसी कार्यालयास टाळे ठोकणार! फायरसेस मुद्द्यावरून मिनी झूम बैठकीत उद्योजकांचा इशारा

Officials of 'Aima', 'Nima' and MIDC, municipal officials attended the mini zoom meeting.
Officials of 'Aima', 'Nima' and MIDC, municipal officials attended the mini zoom meeting.esakal

Nashik News : अंबड आणि सातपूरमधील औद्योगिक वसाहतीत मान्सूनपूर्व कामांसंदर्भात आयमा सभागृहात आयोजित सर्व यंत्रणांच्या आणि विशेषतः मिनी झूम बैठकीत विद्युत, एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांना उद्योजकांनी अक्षरशः धारेवर धरले.

आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, ललित बूब, कुंदन डरंगे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, ज्ञानेश्वर गोपाळे अधिक आक्रमक दिसले. अंबडच्या उद्योजकांच्या बिलात पुढील महिन्यांत फायर चार्जेस समाविष्ट झाल्यास एमआयडीसी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. (MIDC office locked Warning of entrepreneurs in mini zoom meeting on firecess issue Nashik News)

या वेळी महापालिका कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, अंबड चौकीचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता डी. एस. पडळकर, कार्यकारी अभियंता एम. एम. तपासे, मोहन गिते, अमोल बोडके,

विलास गायकवाड यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी विद्युत आणि एमआयडीसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत उद्योजकांचा रोष असल्याचे दिसून आले.

मान्सूनपूर्व कामे करताना नियोजन केले जाईल आणि कोणत्या भागात किंवा वीजपुरवठा खंडित होणार याचे वेळापत्रक निश्चित करून त्याबाबत उद्योजकांना कळविले जाईल, असे ज्येष्ठ विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी बेळे यांनी पैसे घेऊन काम करण्याचे धंदे सोडा, असे अधिकाऱ्यांना सुनावले. उद्योजक वीज मंडळाला भरीव महसूल देतो त्यामुळे आम्हाला चांगली वीज सेवा मिळालीच पाहिजे, असा आग्रह आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी धरला. अमिनिटी प्लॉट आणि मोकळ्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे बंदोबस्ताची मागणी केली असून २० मेपर्यंत एकतरी मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्वासन बोरसे यांनी दिले.

सीईटीपीला लवकरच गती मिळेल असेही ते म्हणाले. दरम्यान सीईटीपीचे एस्टिमेट २१ वरून ८ कोटीवर आले असताना महापालिकेला सहकार्य करण्याचा सल्ला या वेळी एमआयडीसीला देण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Officials of 'Aima', 'Nima' and MIDC, municipal officials attended the mini zoom meeting.
PM Awas Yojana : नगर विकास विभागाकडून झोपडपट्टी नियमितीकरण प्रक्रिया

बैठकीस तक्रार समितीचे दिलीप वाघ, मूलभूत सेवेचे कुंदन डरंगे, देवेंद्र विभूते, अभिषेक व्यास, जयंत पगार, प्रमोद वाघ, अलोक कनाणी, अजय यादव, राहुल गांगुर्डे, विजय जोशी, जयंत जोगळेकर, पॉवर कमिटीचे रवींद्र झोपे, जगदीश पाटील, अविनाश बोडके, देवेंद्र विभूते, अशोक ब्राह्मणकर आणि उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.

अंबड चौकीसाठी वाहन

एमआयडीसीतील कचरा दैनंदिन उचलला जाईल. बंद पथदीप सुरू केले जातील, कुठेही सांडपाणी साठणार नाही याची दक्षता घेऊ. आवश्यक तेथील अतिक्रमण काढू असे महापालिका कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी आणि शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.

मनुष्यबळ कमी असले तरी औद्योगिक वसाहत परिसरात गस्त वाढविणार, भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करणार, असे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर म्हणाले. दरम्यान अंबड चौकीसाठी कुंदन डरंगे यांनी आपले एक वाहन तर जयंत जोगळेकर यांनी संगणक देण्याचे मान्य केले.

Officials of 'Aima', 'Nima' and MIDC, municipal officials attended the mini zoom meeting.
Malegaon Market Committee Election : मालेगावला उत्साह अन् शांततेत मतदान; मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com