Crime
sakal
सातपूर/ नवीन नाशिक: शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत मध्यरात्री वाहनांवर झालेल्या हल्ल्यांनी धक्का बसला आहे. जुने नाशिक येथील नानावली भागात दोघा संशयितांनी अमली पदार्थांच्या नशेत तीन वाहनांची दगडफेक करून तोडफोड केली, तर सातपूरमधील कातकाडेनगर येथे एका संशयिताने सलग चार दुचाकींना आग लावल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. भद्रकाली आणि सातपूर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत संबंधित संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.