दुधाच्या दराने गाठला उच्चांक; म्हशीचे दूध 85 रुपये लिटर!

Hike In Milk Rate latest marathi news
Hike In Milk Rate latest marathi newsesakal

नाशिक : हिरव्या चाऱ्याची टंचाई, जनावरांच्या खाद्याच्या भावाने घेतलेली उसळी व पुढील आठवड्यातील रक्षाबंधन यामुळे दुधाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सत्तर रुपयांच्या आसपास स्थिर असलेल्या म्हशीच्या लिटरभर दुधासाठी गुरुवारी (ता. ४) ग्राहकांना ८५ रुपये मोजावे लागले, तर गाईच्या दुधाच्या आवकेतही मोठी घट झाल्याने पन्नाशी गाठली आहे. (Milk price hits record high Buffalo milk 85 rupees per liter Nashik Latest marathi news)

गेले महिनाभर कोसळत असलेल्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यातच म्हशीसाठी लागणाऱ्या ढेप व अन्य चाऱ्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे दुधाच्या दरांत मोठी वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. गाईच्या दुधाच्या दरांत पंधरा रुपयांनी, तर म्हशीच्या दुधाच्या दरात वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे.

Hike In Milk Rate latest marathi news
Nashik : टायर दुकानात आग; लाखांचे नुकसान

मिठाईसाठी दूध खरेदी

सध्या श्रावण महिना सूरू आहे, त्यामुळे दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच पुढील आठवड्यात रक्षाबंधन आहे. या काळात मिठाईला मोठी मागणी असते. त्यामुळे आपसूकच दुधाच्या मागणीतही मोठी वाढ होते.

त्यामुळे दूध बाजारात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने दुधाच्या दराने उच्चांकी भाव गाठल्याचे दूध विक्रेते हलीम पहिलवान यांनी सांगितले. पुढील काळात दुधाचे दर पूर्वपदावर येतील, असे ते म्हणाले.

Hike In Milk Rate latest marathi news
NMCने गौण खनिजाची रॉयल्टी बुडवल्याने नोटीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com