Crime
sakal
नाशिक: काही महिन्यांपूर्वी झालेल्या शालेय वादातून निर्माण झालेल्या रागातून एका अल्पवयीनाने भरधाव कार चालवत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल परिसरात घडली. या घटनेत दोघेही विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.