Crime
sakal
नाशिक
Nashik Crime : रागाच्या भरात घर सोडलं अन नराधमाच्या तावडीत सापडली; नाशिकमधील एका चिमुरडीचा थरार!
Minor Girl Runs Away, Falls Prey to Sexual Predator : नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा छडा लावून आरोपीला शिक्षा मिळवून देणाऱ्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मृदुला नाईक आणि पीडित मुलीचा दोन वर्षांनंतरचा पुनर्वसन प्रवास.
अल्पवयीन मुलगी रागाच्या भरात घर, गाव सोडून नाशिकला पोहोचल्यावर एका नराधमाच्या वासनेची शिकार झाली. मोठ्या हुशारीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत तिने पोलिस ठाणे गाठले. अखेर भद्रकाली पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी कसोशीने तपास करीत नराधमाला बेड्या ठोकल्या.
