नाशिक- उंटवाडी येथील नाशिक बालनिरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंधरा दिवसांपासून ही मुलगी गायब असून, तिची विक्री झाल्याचा गंभीर आरोप मुलीच्या पालकांनी केला. या प्रकरणामुळे निरीक्षणगृहातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर तसेच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.