Crime
sakal
नाशिक: पाच वर्षांपूर्वी अचानक घरातून निघून गेलेल्या मुलीचा काहीही थांगपत्ता न लागल्याने ती मृत झाली, असाच समज मुलीच्या जन्मदात्रीचा झाला होता. परंतु, मुलगी दारात उभी राहताच त्या जन्मदात्रीला आनंदाचा मोठा धक्काच बसला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिचे अश्रू अनावर झाले होते... पाच वर्षांपूर्वीच अपहरण झालेल्या या अल्पवयीन मुलीला शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती विशेष पथकाने शोधून आणले. याप्रकरणी किरण (रा. जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.