esakal | कोरोनात विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’! पात्र लाभार्थ्यांना मिळणार 'या' योजना
sakal

बोलून बातमी शोधा

mission vatsalya

कोरोनात विधवा महिलांसाठी ‘मिशन वात्सल्य’! मिळणार 'या' योजना

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : कोरोनामुळे (coronavirus) दोन्ही पालकांचे निधन होऊन झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ (mission vatsalya) राबविण्यात येणार आहे. मिशनअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणार या योजना....

मिशनअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजना

मिशन वात्सल्य अंतर्गत गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका तसेच शहरी क्षेत्रातील वॉर्डनिहाय पथकामध्ये तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ बालकांच्या कुटुंबीयांना भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच, विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.

हेही वाचा: सणासुदीत गॅस सिलिंडर दरवाढीने अर्थकारण बिघडले

मिशनअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजना

कुटुंब निवृत्तिवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना, शुभमंगल सामूहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच, स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरून घेऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: भंडारदरा ओव्हरफ्लो! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधाने काम केले जाणार असून, महिला व बालकांचा मालमत्ताविषयक हक्क अबाधित राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. तसेच, ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधारकार्ड, जन्म-मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी साहाय्य करण्यात येणार आहे.

आकडे बोलतात...

* कोरोनात एक पालक गमावलेले : १८ हजार ३०४

* कोरोनामुळे विधवा झालेल्या माता : १६ हजार २९५

* कोरोनाने गमावलेल्या माता : दोन हजार ९

* दोन्ही पालक गमावलेली मुले : ५७०

मिशन वात्सल्यच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांत तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून, गटशिक्षण अधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगर पारिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्याधिकारी, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी (समाज कल्याण), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यात उपयोजनेचे प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांच्या पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सदस्य, तर बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ शहरी) सदस्य सचिव असणार आहेत.

loading image
go to top