esakal | भंडारदरा धरण ओव्हरफ्लो! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

bhandardara dam

भंडारदरा ओव्हरफ्लो! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
गौरव परदेशी

खेडभैरव (जि.नाशिक) : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने (ता.१३) सकाळी धरणे भरले असून जलसंपदा विभागाने स्पिलवेचे गेट उघडून २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेसने पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. गंगापूर धरणातून सकाळी 9 वाजता एकूण २५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने या धरणातून 800 क्यूसेक्स विसर्ग आठ वाजता सोडण्यात आला.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भंडारदरा जलाशय भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रतनवाडी, पांजरे, घाटघर, भंडारदरा, वाकी, परिसरात सलग दोन दिवस पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले. दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी धरण भरते, मात्र यंदा जलाशय महिनाभर उशिराने भरले आहे. जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहेत; तर वाकी जलाशयातून ८९० क्युसेकने कृष्णवंती नदीला पूर आला आहे. त्यामुळे रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून निळवंडे जलाशय लवकरच भरेल असा अंदाज जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील ११ पैकी ९ लघु पाटबंधारे प्रकल्प भरले आहेत.

हेही वाचा: इगतपुरीत पावसाची धुवांधार बॅटिंग! २४ तासात झाला ९८ मिमी पाऊस

जलपूजन उत्साहात

स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी सपत्निक पूजन करून जलाशयाला साडी चोळी श्रीफळ अर्पण केले. सरपंच दिलीप भांगरे, वकील अनिल आरोटे उपस्थित होते. जलपूजनप्रसंगी भांगरे यांनी आता निसर्गपर्यन वाढू शकेल अन व्यावसायिकांना रोजगार मिळेल असे सांगितले.

हेही वाचा: छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

loading image
go to top