Mistura Art Fest 2022 : यंदा रंगणार मिस्‍तुरा आर्ट फेस्‍ट!; 24, 25 डिसेंबरला आयोजन

Mistura Art Fest 2022
Mistura Art Fest 2022 esakal

नाशिक : स्‍थानिक कलावंतांना हक्‍काचे व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देताना, कलाप्रेमींना अनोख्या कलाकृती अनुभवायला मिळणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्‍या दोन वर्षांपासून खंड पडल्‍यानंतर यंदा मिस्‍तुरा आर्ट फेस्‍ट होणार आहे. शौर्य फाउंडेशनतर्फे येत्‍या २४ व २५ डिसेंबरला गंगापूररोडवरील गोदा पार्क येथे या फेस्‍टचे आयोजन केले आहे. (Mistura Art Fest 2022 will Held on 24th 25th December Nashik news)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Mistura Art Fest 2022
Makar Sankranti 2023 : नाशिककरांना ‘पुष्पा’ पतंगची भूरळ!; यंदा पतंग बाजार तेजीत, मागणीही वाढली

यावर्षीच्‍या मिस्तुरा आर्ट फेस्टची संकल्‍पना ‘ओपन आर्ट’ अशी आहे. नियोजित दोन दिवसांमध्ये फेस्ट सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सुयोजित व्हॅली येथे भरविला जाणार आहे. या आर्ट फेस्टमध्ये कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, हॅण्डमेड दागिने व खाद्य पदार्थ यांसारखे स्टॉल असतील. याशिवाय नाशिकच्या नामांकित कलाकारांनी, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती व इन्स्टॉलेशन उभ्या केल्या जाणार आहेत. कला प्रेमींसाठी विविध छायाचित्रे प्रदर्शन व चित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजनदेखील विद्यार्थी करत आहेत.

शंभर कलाकारांचे सादरीकरण

यंदा होणाऱ्या फेस्टमध्ये प्रदर्शन व उपक्रमांसोबत शंभराहून अधिक कलाकारांचे कला सादरीकरण होणार आहे. या शिवाय म्युझिकल नाइट, ढोल वादन, लाइव्ह पेंटिंग, रॉक बॅण्ड, क्लासिकल आणि फोक संगीत यांसारखे धमाल सादरीकरण महोत्‍सवात केले जाणार आहे. या फेस्‍टिव्हलची तयारी सुरु असून, कलाप्रेमींनी आवर्जून भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे. या फेस्टिवलला प्रवेश मोफत आहे.

Mistura Art Fest 2022
Smart Power Distribution System : स्मार्ट वीजयंत्रणेचा 2200 कोटींची आराखडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com