esakal | लस वितरणातील नाशिकवरचा अन्याय दूर करा
sakal

बोलून बातमी शोधा

bjp mla devyani farande chief minister

लस वितरणातील नाशिकवरचा अन्याय दूर करा

sakal_logo
By
विक्रात मते

नाशिक : नाशिकमध्ये दररोज वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड लशींची संख्या फार कमी आहे. मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या लशींचे वितरण केले असून, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येच्या बाबतीत नाशिक शहर व जिल्हा पुढे असताना रुग्णसंख्येचा विचार करून राज्य सरकारने कोव्हॅक्सिन (Covaxin) व कोव्हिशील्ड (Covishield) लशींच्या वितरणातील अन्याय दूर करावा, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (MLA Farande demand to Chief Minister Thackeray to supply vaccines for Nashik)

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कोव्हॅक्सिन लशीचे ४, ७९, १५० डोस मिळाले होते. नाशिक जिल्ह्याला केवळ १६ हजार लशींचे वाटप केले आहे, तर कोव्हिशील्ड लशीच्या नऊ लाख डोसांच्या वितरणात नाशिक जिल्ह्याला फक्त ३२ हजार लशींचे वाटप केले. यामध्ये नाशिक महापालिकेला मात्र आठ हजार ५०० लशींचे वितरण केले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेने केलेल्या मागणीच्या तुलनेत लशींचा अल्प पुरवठा झाल्याने उपलब्ध लशींचे डोस जेमतेम दोन दिवस पुरू शकणार आहेत. त्यानंतर नाशिक शहरात सुरू असणारी लसीकरण केंद्रे पुन्हा बंद करण्याची नामुश्‍की महापालिकेवर ओढवणार असल्याचे प्रा. फरांदे यांनी पत्रात सांगितले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये ‘टॉसिलिझुब’ इंजेक्शनचा काळा बाजार! फार्मसीचे 2 विद्यार्थी ताब्यात

दरम्यान, राज्य सरकारकडून नाशिक जिल्ह्यावर होत असणारा अन्याय दुर्दैवी असून, जागतिक महामारीसाठी प्रतिबंधक असलेल्या लशीच्या वाटपातदेखील राजकारण होत असून, हे निषेधार्ह असल्याचे आमदार फरांदे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच यापूर्वी रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनवाटपाच्या बाबतीतदेखील राज्य सरकारकडून जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला होता. या संदर्भात आमदार फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाशिकमधील परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती; परंतु राज्य सरकारकडून याबाबतीत कोणतीही सुधारणा करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

MLA Farande demand to Chief Minister Thackeray to supply vaccines for Nashik

हेही वाचा: नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; केंद्रांवर गर्दी