esakal | नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; केंद्रांवर गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

नाशिकमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; केंद्रांवर गर्दी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट भयानक असल्याचे भाकीत व्यक्त केले जात असल्याने नागरिकांकडून लसीकरणाची मोठी मागणी होत आहे. नाशिक महापालिका हद्दीमध्ये एकूण ४९ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू आहे

केंद्रांवर लस घेण्यासाठी मोठी गर्दी

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेली लसीकरण मोहीम बुधवारी (ता.५) महापालिकेला साडेआठ हजार डोस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुरू झाली. लसीकरण करताना ज्या व्यक्तींचा दुसरा डोस आहे, त्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना राज्य शासनाकडून आल्याने केंद्रांवर लस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली.

हेही वाचा: Sakal Impact : प्रवाशांनो..पळवाटा शोधाल तर पडेल महागात!

साडेआठ हजार लस महापालिकेला प्राप्त

आत्तापर्यंत कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे सुमारे अडीच लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहे. महापालिकेकडे असलेला साठा संपुष्टात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाकडून साडे अकरा हजार लस मागविण्यात आल्या. यादेखील संपल्याने शनिवारपासून लसीकरण मोहीम बंद करण्यात आली होती. बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयाकडून साडेआठ हजार लस महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर बारा वाजेपासून २९ लसीकरण केंद्रांवर मोहीम सुरु करण्यात आली. शासनाकडून प्राप्त झालेले साडेआठ हजार डोस ४५ व यापुढील नागरिकांना देण्याच्या सूचना देण्यात आल्याने केंद्रांवर गर्दी उसळली.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना जिल्हा चेक पोस्टवर ड्युटी ?

दुसऱ्या डोसला प्राधान्य

महापालिकेला साडेआठ हजार डोस प्राप्त झाले असले तरी शासनाने दुसऱ्या डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्याने अनेकांना केंद्रांवरून माघारी फिरावे लागले. पहिला डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने वाट पाहावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने दुसरा डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत.