इंदिरानगर- वडाळा भागातील अनधिकृत भंगार गुदामे, म्हशींचे गोठे आणि अतिक्रमणासह इतर प्रश्न मनपा प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने घ्या अन्यथा विधिमंडळ पातळीवर हे प्रश्न नेले जातील, असा अप्रत्यक्ष इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिला. यासोबतच साईनाथ चौफुली ते गॅस गोडाउनपर्यंतचा शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवून हा रस्ता मोकळा करावा, अशी सूचना केली.