नांदगावसाठी ७ कोटी द्या, आमदार कांदेंची नगरविकासमंत्र्यांकडे मागणी

mla kande demanded a relief fund of 7 crore for nandgaon
mla kande demanded a relief fund of 7 crore for nandgaon Sakal

नांदगाव (जि. नाशिक) : शहरातील पूरपण्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी ते सुरळीत होण्यासाठी सात कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सकारात्मकता दाखवत मंत्री शिंदे यांनी आमदार कांदे यांच्या निवेदनाची दाखल घेत प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार सुहास कांदे यांनी भेट घेत नांदगाव शहराच्या परिस्थितीवर चर्चा केली. त्यांना नदीपात्राच्या दुतर्फा संरक्षक भिंत उभारणे, नदीपात्राच्या रुंदीकरणासह खोलकरणाच्या उपाययोजनांना चालना मिळावी, विवेक हॉस्पिटलपासून स्मशानभूमीकडे वाहून गेलेला कचरा डेपोपर्यंतचा रस्ता नव्याने तयार करणे आदी विविध कामांच्या आवश्यकतेसाठी तसेच अन्य प्रकारच्या पायाभूत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. पालिकेला असा निधी विनाविलंब द्यावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली होती. शहराचे झालेले अतोनात नुकसान, व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून आमदार कांदे यांनी ना. शिंदे यांना परिस्थिती दाखवली. ते बघून मंत्री शिंदे यांनी लवकरच निर्णय घेऊन विषय मार्गी लावण्याची सकारात्मकता दाखविली.

mla kande demanded a relief fund of 7 crore for nandgaon
राज ठाकरेंचा शाखा प्रमुखांना इशारा; म्हणाले, बोलावलं त्यांनीच…
mla kande demanded a relief fund of 7 crore for nandgaon
जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com